मुंबई : आपण आपल्या दैनंदिन जीवनात इतके बिझी असतो की, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्या रोजच्या आहारामुळे शरीर कमकुवत होऊ लागतं आणि किरकोळ काम करूनही बॉडी पेन होण्याची समस्या उद्भवू शकते. हाडं कमकुवत होणं हे त्याचं प्रमुख कारण आहे, अशा परिस्थितीत नेमक्या काय होतात याकडे लक्ष दिलं पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सवयींमुळे तुमची हाडं होतायत कमकुवत


चुकीची लाईफस्टाईल


जर तुम्ही शरीरिक कामं कमी करत असाल किंवा जास्त आळशीपणा करत असाल तर हाडे कमकुवत होण्याचं हे एक मोठं कारण आहे. चालण्यासोबतच व्यायाम करत राहणं फायद्याचं आहे. अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात.


अपुरी झोप


पुरेशी झोप न मिळाल्यास हाडं कमकुवत होण्याची समस्या निर्माण होते. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 7 ते 8 तास झोप न घेतल्यास कमकुवत हाडांसह इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.


आहारात मीठाचा अधिक समावेश


जर तुम्हाला अधिक मीठ खाण्याची सवय आहे तर ही सवय तुमची हाडं कमकुवत करू शकते. मिठात सोडियमचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे शरीरातून कॅल्शियम कमी होऊ लागते. हाडांच्या मजबूतीसाठी हा पोषक घटक खूप मोठा असतो.


धुम्रपान करू नका


धुम्रपानाचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे. पण तुम्हाला कल्पना आहे की यामुळे हाडंही कमकुवत होतात. त्यामुळे धुम्रपान करणं टाळा.