नवी दिल्ली : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार वाढणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवार गडकरी यांनी म्हटलं की, 24 कंपन्यांनी देशातील सर्वात मोठं कंटेनर बंदर जेएनपीटीशी संबंधित विशेष आर्थिक क्षेत्रात 60,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.


रोजगाराच्या संधी


न्यूज २४ च्या बातमीनुसार, गडकरींनी एका कार्यक्रमात म्हटलं की, '24 कंपन्यांनी जेएनपीटी सेजमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा दर्शवली आहे. या कंपन्या याचा वापर निर्यात करण्यासाठी करतील.
यामुळे 60,000 कोटींची गुंतवणूक होईल आणि 1.25 ते 1.50 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.


कंपनीबाबत खुलासा नाही


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मे 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच यांचं उद्घाटन केलं होतं. गडकरींनी पुढं म्हटलं की, 'एका कंपनीने म्हटलं की ते 6000 कोटी रुपये गुंतवतील. ज्यामुळे 40,000 लोकांना रोजगार मिळेल.' पण त्यांनी त्या कंपनीबाबत कोणताही खुलासा नाही केला.