नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत जगभरात 1.65 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एका दीड महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दिल्लीतील सर्वात कमी वयाचा कोरोना संक्रमण झालेला हा बाळ होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीमध्ये COVID-19 ची लागण झालेल्या लहान मुलाच्या मृत्यूची ही पहिली घटना आहे. दिल्लीत 45 दिवसाच्या आणि 10 महिन्याच्या बाळांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बालकांना सारी वार्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनाच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं.


दिल्ली सरकारच्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीत रविवारी कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2003 वर पोहोचली आहे. ज्यामध्ये 110 हे नवीन रुग्ण आहेत. तर एका दिवसात 2 जणांचा मृत्यू झाला आहे.


दिल्लीत आतापर्यंत कोरोनामुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचं वय 25 ते 60 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक आहे. जे एकूण मृतांच्या 56 टक्के आहे. यामध्ये 10 जण 50-59 वयादरम्यानचे तर 10 जणांचं वय 50 पेक्षी कमी होतं.