नवी दिल्ली : गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकींचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. याबरोबरच भाजपने कॉंग्रेसचं आणखी एक राज्य आपल्या खिशात घातलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता कॉंग्रेसकडे केवळ ४ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश शिल्लक राहिलं आहे. यावेळी गुजरातमध्ये सत्ता स्थानप करण्याची अपेक्षा कॉंग्रेसने ठेवली होती. पण निकाल उलटे आले आहेत. इतकेच काय तर कॉंग्रेसच्या हातून हिमाचल प्रदेशची सत्ताही गेली. आता कॉंग्रेसकडे केवळ ४ राज्य शिल्लक राहिली आहेत. 


कॉंग्रेसची सत्ता आता कुठे?


कॉंग्रेसची सत्ता आता केवळ पंजाब, कर्नाटक, मिझोराम आणि मेघालय या राज्यांमध्ये शिल्लक राहिली आहे. तसेच या राज्यांसोबत केंद्र शासित प्रदेश पॉंडेचरीमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. लोकसंख्येच्या हिशेबाने बघायचं तर देशातील केवळ ७.७८ टक्क्यांच्य बरोबरीतील राज्यांवरच कॉंग्रेसची सत्ता अजूनही आहे.


भाजपची सत्ता कुणाकडे?


कॉंग्रेसकडे आता केवळ कनार्टक सर्वात मोठं राज्य आहे. तेच भाजप सध्या १३ राज्यांमध्ये सरकार चालवत आहेत. यासोबतच ५ राज्यांमध्ये त्यांच्या सहका-यांचं सरकार आहे. 


या ४ राज्यांमध्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात कॉंग्रेस


राज्य           लोकसंख्या टक्केवारी
१)  कर्नाटक     ५.०५%
२)  पंजाब       २.२९%
३)  मेघालय     ०.२५%
४) मिजोरम     ०.०९%
५) पुड्डुचेरी     ०.१०%


भाजपची सत्ता असलेली राज्ये


राज्य           लोकसंख्या टक्केवारी
१)  उत्तरप्रदेश      १६.१६%
२)  उत्तराखंड       ०.८३%
३)  हरियाणा       २.१%
४)  राजस्थान      ५.७%
५)  गुजरात        ५.०%
६)  छत्तीसगढ़        २.१%
७)  मध्यप्रदेश       ६.०%
८)  असम           २.५८%
९)  हिमाचल         ०.५७%
१०) गोवा           ०.१२%
११) मणिपुर         ०.२४
१२) अरुणाचल      ०.११ %
१३) झारखंड       २.७%


भाजपची भागीदारी असलेली सत्ता


१) बिहार           ८.६०%
२) जम्मू-कश्मीर     १.०६%
३) महाराष्ट्र         ९.३%
४) आंध्रप्रदेश        ४.०८%
५) नगालैंड          ०.१६%