Jammu and Kashmir bus accident : जम्मू काश्मीरमध्ये बस पुलावरुन कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत. ही बस अमृतसरवरुन कटराकडे जात होती. झज्जर कोटली भागात ती पुलावरुन खाली कोसळली. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरुन कोसळल्याचे बोललं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. मृतांमध्ये बिहारमधील लाखी सराय आणि बेगुसराय जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बचाव कार्यात गुंतलेले सीआरपीएफ अधिकारी अशोक चौधरी म्हणाले की, सकाळी अपघाताची माहिती मिळताच. आमची टीम तात्काळ येथे पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमच्यासोबत पोलिसांचे पथकही बचाव कार्यात गुंतले आहे. बचावकार्य सुरु आहे. कटरा येथे जात असलेल्या बसमध्ये बिहारचे लोक होते, असे सांगण्यात येत आहे.



जम्मू-काश्मीरमध्ये अमृतसरहून येणारी बस खोल दरीत कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांने सांगितले. या अपघातात आणखी 12 प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे जम्मू उपायुक्त कार्यालयाने सांगितले. ही बस रियासी जिल्ह्यातील कटरा येथे जात होती. अमृतसरहून कटराला जाणारी बस जम्मूमध्ये दरीत कोसळली. या अपघातात 7 लोक मृत्यू पावले तर चार जण गंभीर जखमी झालेत. तर 12 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती जम्मू उपायुक्त कार्यालयाने दिली. चार गंभीर जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलविण्यात आले आहे आणि इतर 12 जखमींवर स्थानिक पीएचसीमध्ये उपचार सुरु आहेत. 



बस कटरा येथे जात असताना झज्जर कोटली परिसरात हा अपघात झाला. बसमधील भाविक माता वैष्णोदेवी मंदिराकडे जात होते. कटरा हे त्रिकुटा टेकड्यांवर वसलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे बेस कॅम्प आहे. जम्मूचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक चंदन कोहली यांनी सांगितले की, आठ जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरु आहे. बचावकार्यात स्थानिक रहिवासी पोलिसांना मदत करत आहेत.


त्यांनी सांगितले की, जखमींना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, 21 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात माता वैष्णोदेवीच्या यात्रेकरुंना घेऊन जाणारी बस उलटून 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता, तर 24 जण जखमी झाले होते.