नवी दिल्ली : सरकारने पासपोर्ट बद्दल एक मोठी घोषणा केली आहे.  परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे की, ८ वर्ष कमी आणि ६० वर्षापेक्षा कमी व्यक्तींना १० टक्के कमी फी द्यावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पासपोर्ट कायद्याला ५० वर्ष पूर्ण होतं आहे. यानिमित्त परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आणखी एक सुविधा दिली आहे. आता पासपोर्ट इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत असणार आहेत.


सरकारने याआधी तुमच्या घरापासून ५० किलोमीटरच्या आत पासपोर्ट केंद्र उभारण्याची घोषणा केली होती. हे पासपोर्ट सेवा केंद्र देशातील विविध पोस्ट ऑफीसमध्ये उघडले जातील. सरकारने ८६ पोस्ट ऑफीस केंद्रांमध्ये ते उभारणार असल्याची घोषणा केली आहे. स्वराज यांनी सांगितलं की, 2014 नंतर एनडीए सरकार आल्यानंतर २५१ पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात आले आहेत.