नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्यांसाठी यंदा आनंदाची बातमी येऊ शकते. यंदा १० टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे. ग्लोबल कंसल्टिंग फर्म कॉर्न फेरीच्या मते, भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. ज्यामुळे कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ देऊ शकते. आशियामध्ये भारत हा एकमेव देश राहणार आहे. ज्या देशात यंदा चांगली पगारवाढ होऊ शकते.


काय आहे अनुमान? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये देशात वेतनवाढ ९ ऐवजी १० टक्के होऊ शकते. महागाईवर पगारवाढ अवलंबून असते. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर, दरवर्षी जेवढा पैसा वाढतो. महागाई देखील तेवढीच वाढते. दोघांमध्ये परस्पर संबंध असतो. कॉर्न फेरी इंडियाचे CMD नवनीत सिंह यांनी म्हटलं की, जलद इकोनॉमिक ग्रोथमुळे वेतन वृद्धी आणि वास्तविक वेतन वृद्धीमध्ये भारत आशिया खंडात टॉपवर आहे.


आशियाई देशांमधील वाढ


रिपोर्टनुसार, आशियामध्ये यावर्षी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ५.६ टक्क्यांनी वाढू शकते. जर एकूण वाढमधून महागाई दर कमी केला तर वास्तविक ग्रोथ जवळवास २.६ टक्के राहिल. आशिया खंडात २०१९ मध्ये वेतन वृद्धी ही चीनमध्ये ३.२ टक्के, जपानमध्ये ०.१० टक्के, व्हियतनाममध्ये ४.८० टक्के, सिंगापूरमध्ये ३ टक्के आणि इंडोनेशियामध्ये ३.७० टक्के राहणार आहे.