शेवटच्या ओव्हर राहिल्यात, अजून बरेच सिक्सर बाकी आहेत- रवीशंकर प्रसाद
सवर्ण आरक्षण विधेयक हा सिक्सर नाही.
नवी दिल्ली: आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना आरक्षण देण्यासाठी राज्यसभेत बुधवारी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. यानिमित्ताने राज्यसभेत वादळी चर्चा झाली. तेव्हा केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. क्रिकेटमध्ये शेवटच्या निर्णायक षटकांमध्ये षटकार मारले जातात. विरोधकांना याचा त्रास होत असेल तर त्यांना अजून षटकार बघायचेत. सवर्ण आरक्षण विधेयक हा सिक्सर नाही. खरे सिक्सर तर पुढे पाहायला मिळतील, असे वक्तव्य रवीशंकर प्रसाद यांनी केले.
रोजगार न देऊ शकल्यानेच सरकारकडून सवर्णांना आरक्षणाचे गाजर; राज्यसभेत विरोधकांची टीका
सवर्ण आरक्षण विधेयक मंगळवारी लोकसभेत ३२३ विरुद्ध ३ अशा फरकाने मंजूर झाले होते. त्यानंतर हे घटनादुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडण्यात आले. राजद आणि द्रमुक हे पक्ष वगळता सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. मात्र, विरोधकांनी या विधेयकासंदर्भात अनेक शंकाही उपस्थित केल्या आहेत. विरोधकांच्या या आक्षेपांना रवीशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले. २०१० साली हे विधेयक आणण्यापासून काँग्रेसला कोणी रोखले होते?, असा सवाल रवीशंक्र प्रसाद यांनी विचारला.
वेन देअर इज नो विल देअर इज सर्व्हे; धनगर आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला
हे विधेयक मंजूर झाल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सवर्णांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळेल.