१० चे कोणते नाणे खरे ; आरबीआयने केला खुलासा
१० रुपयांच्या नाण्याबद्दल लोकांमध्ये काहीसा गोंधळ आहे.
नवी दिल्ली : १० रुपयांच्या नाण्याबद्दल लोकांमध्ये काहीसा गोंधळ आहे. हा गोंधळ आता रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दूर केले आहे. आरबीआयने सांगितले की, सध्या बाजारात १० रुपयांची जी काही नाणी आहेत ती सर्व वैध आहेत. आतापर्यंत १४ वेगवेगळ्या डिझाईन्सची नाणी उपलब्ध आहेत आणि ती सर्व वैध आहेत.
पूर्वी देखील दिले होते स्पष्टीकरण
आरबीआयने पूर्वी नोव्हेंबर महिन्यात देखील याबद्दलचे स्पष्टीकरण दिले होते. तरी देखील कोणी १० रुपयांचे नाणे स्विकारण्यास तयार नसल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बोलले जात होते. आरबीआयने स्पष्टीकरण देऊनही लोकांमध्ये गोंधळ आणि भिती होतीच.
वेगवेगळ्या प्रकारची नाणी
RBI स्पष्टीकरण देताना सांगितले की, नाणी भारत सरकारच्या मिंटमध्ये तयार होतात. आणि सर्व शिक्क्यांवर वेळोवेळी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मुल्यांवर दर्शवली जातात.
लोकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत. त्यामुळे लोक ते घेताना काहीसे कचरतात.
नाण्याच्या १४ डिझाईन्स
१० रुपयांच्या नाण्याचे सध्या बाजारात १४ वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. ते सर्व आरबीआयने सादर केलेले आहेत. बाजारात १० रुपयांची जितकी ही नाणी आहेत ती सर्व चालणारी आहेत.
न घाबरता करा व्यवहार
आरबीआयने जनतेला विश्वास दिला आहे की, न घाबरता १० रुपयांच्या नाण्याची देवाण-घेवाण करा. याशिवाय आरबीआयने बॅंकेच्या सर्व शाखांवर देखील १० रुपयांच्या नाण्याची देवाण-घेवाण करा.