मुंबई : 10 Rupee Coin : अनेकदा बाजारात खरेदी केल्यावर सुट्टे पैसे दिले जातात. या सुट्या पैशांमध्ये १० रुपयांच्या नाण्यांचा देखील समावेश असतो. अशावेळी आपला गोंधळ होतो. एकाचवेळी जर १० ते दोन-तीन नाणी सुट्टे म्हणून दिले जातात. अशावेळी नक्की कोणतं नाणं खरं? असा प्रश्न पडतो. 


१० रुपयांची अनेक नाणी चलणात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा गोंधळाचे कारण म्हणजे बाजारात 10 रुपयांची नाणी अनेक प्रकारची आहेत. नुकतेच केंद्र सरकारने याबाबतची परिस्थिती संसदेत स्पष्ट केली. 10 रुपयांची नाणी पूर्णपणे वैध असून ती बनावट नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.


अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांचं उत्तर 


सर्व प्रकारच्या व्यवहारांसाठी 10 रुपयांची नाणी कायदेशीर व्यवहारात वापरली जाऊ शकतात, असे सरकारकडून सांगण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ८ फेब्रुवारी रोजी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, १० रुपयांची सर्व नाणी कायदेशीर निविदा आहेत.


ते म्हणाले की, भारत सरकारच्या अखत्यारीतील विविध आकार, थीम आणि डिझाइनमध्ये तयार केलेली. RBI द्वारे प्रसारित केलेली 10 रुपयांची नाणी कायदेशीर निविदा आहेत. ते सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये कायदेशीर निविदा म्हणून वापरले जाऊ शकतात. राज्यसभेत ए विजयकुमार यांच्या प्रश्नाला पंकज चौधरी उत्तर देत होते. 


RBI देखील करतं जागरूक 


चौधरी पुढे म्हणाले की, वेळोवेळी १० रुपयांची नाणी स्वीकारली जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी, गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी, RBI वेळोवेळी प्रसिद्धीपत्रकाद्वारे लोकांना जागरूक करत असते. RBI ने आधीच सांगितले आहे की 10 रुपयांची सर्व 14 डिझाईन नाणी वैध आणि कायदेशीर निविदा आहेत.