मुंबई : लवकरच देशवासियांच्या हातात नवी १० रुपयांची नोट असणार आहे. पण ज्या प्रकारे ५०० आणि २००० रुपयांच्या नव्य़ा नोटा आल्यानंतर त्याच्या नकली नोटा देखील आल्या होत्या. त्याच प्रकारे १० रुपयांच्या नोटाच्या बाबतीत देखील होऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० रुपयांची नवी नोट चॉकलेटी रंगाची आहे. ज्यावर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर. पटेल यांचे हस्ताक्षर आहे. नव्या नोटेच्या पृष्ठभागावर सूर्य मंदिर, कोणार्कचं चित्र आहे. जो देशाचा सांस्कृतिक वारसा सांगतो.


कशी आहे नवी १०ची नोट


१. देवनागरीमध्ये १० अंक


२. मध्य भागात महात्मा गांधींचं चित्र


३. सूक्ष्म अक्षरात RBI, भारत, ‘INDIA आणि 10


४. नोटेच्या तारेवर भारत आणि RBI


५. उजव्या बाजुला अशोक स्तंभ


६. महात्मा गांधी यांचं चित्र आणि इलेक्ट्रोटाइप (10) वॉटरमार्क


७. उजव्या बाजुला अंकाचा वाढता फॉन्ट


८. नोटेच्या डाव्या बाजुला वर्ष


९. स्लोगन सहित स्वच्छ भारत लोगो


१०. नोटचा आकार 63 मिमी x 123 मिमी