राष्ट्रपती निवडणूक : रामनाथ कोविंद यांच्याशी संबधित १० गोष्टी
राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद हे उमेदवार असतील.
मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद हे उमेदवार असतील.
रामनाथ गोविंद यांच्याबद्दल ७ गोष्टी
१. रामनाथ कोविंद यांचा जन्म ०१ ऑक्टोबर १९४५ ला उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका छोट्या गावात झाला.
२. रामनाथ कोविंद हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत.
३. ८ ऑगस्ट २०१५ ला ते बिहारचे राज्यपालपदी निवडले गेले.
४. याआधी २ वेळा ते राज्यसभेचे सदस्य होते. उत्तरप्रदेशातून १९९४ ते २००० आणि नंतर २००० ते २००६ राज्यसभेवर खासदार होते.
५. रामनाथ कोविंद हे वकील आहेत आणि दिल्लीच्या उच्च न्यायालयात ते प्रॅक्टिस देखील करत होते.
६. १९९८ ते २००० पर्यंत गोविंद भाजपच्या दलित मोर्चा आणि ऑल इंडिया कोळी समाजाचे ते अध्यक्ष देखील होते.
७. भाजपचे ते राष्ट्रीय प्रवक्ते देखील होते.
८. कानपूर विद्यापीठातून त्यांनी बी.कॉम आणि एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे.
९. १९८० ते १९९३ ते केंद्र सरकारच्या स्टँडिग काऊंसिलमध्ये होते.
१०. आदिवासी, होम अफेअर, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, सामाजिक न्याय, कायदा व सुव्यवस्था आणि राज्यसभा हाऊस कमेटीचे ते चेअरमन होते.