मुंबई : भविष्यातील यशाच्या आशेने इस्त्रोला १० वर्षाच्या मुलाने एक पत्र लिहलं आहे. त्याने त्याच्या पत्राद्वारे इस्त्रोला प्रोत्साहन दिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चांद्रयान 2 सुरू होण्याच्या वेळी सुमारे ६० मुले ही, इस्त्रोच्या मुख्यालयात हजर होती. ६ सप्टेंबरच्या रात्री चंद्रावर उतरताना लेंडर विक्रमचा इस्रोच्या शास्त्रज्ञांशी संपर्क तुटला. त्यामुळे शास्त्रज्ञ फार निराश झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यालयात हजर असणारी मुले ही, हार मानण्यास तयार नव्हती. पण नाईलाज शेवटी त्यांना सत्यता स्वीकारावी लागली. परंतु आणखी एक मुलगा आहे, जो त्यावेळी तेथे हजर नव्हता. पण त्याचे संपूर्ण लक्ष मोहिमेवर होते. अंजनेय कौल असे त्याचे नाव आहे. 


अंजनेयने लिहिलेल्या पत्राला त्याच्या आईने म्हणजेच ज्योती कौल यांनी टि्वट केलं. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी सुद्धा या पत्राला रिटि्वट केल्यानंतर, हे पत्र सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झालं.



अंजनेय या पत्रात लिहितो, 'इतक्या लवकर निराश होऊ नका. आपण लवकरच चंद्रावर पोहचणार, आपले दुसरे लक्ष हे चांद्रयान ३ आहे. ज्याला आपण जूनमध्ये लॉन्च करणार आहोत. विसरू नका की, ऑर्बिट आता देखील तिथे उपस्थिती आहे. तो आपल्याला फोटो पाठविणार, ज्यामुळे आपले पुढचे पाऊल काय असणार, हे आपण ठरवू शकणार.


कदाचित विक्रमने खरचं लॅन्ड केलं असणार आणि प्रज्ञान आता सुद्धा जिवंत असेल आणि ग्रॉफिकल बॅन्डस पाठविण्यास तयार होत असेल. तेव्हा यश आपल्या हातात असणार, तेव्हा इस्रोचे शास्त्रज्ञ येणाऱ्या पीढीसाठी प्रेरणा ठरणार आहे. इस्रो तुम्ही आमचा गर्व आहात. देशाच्या वतीने तुम्हाला मनापासून धन्यवाद. जय हिंद.' असं या पत्रात अंजनेय लिहलं आहे.


या पत्रामुळे इस्त्रोच्या शास्त्रज्ञांना अंजनेयचं नक्कीच कौतुक वाटणार आहे. त्यानंतर अंजनेय जसे पत्रात लिहलं होता तसेच झालं आहे. ८ सप्टेंबरला चांद्रयान २ च्या 'विक्रमने हार्ड लँडिंग केली मात्र ऑर्बिटरच्या कॅमेऱ्याने जे छायाचित्र पाठवलं आहे, त्यानुसार कळतं की विक्रम नियोजित स्थळावर उभे आहे. ते तुटलेलं नाही. 


'विक्रम लेंडर हा सुरक्षित आहे, असे के. सिवन यांनी सांगितले. इस्त्रोला या मोहिमेत ९५% यश आले आहे. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार विक्रमशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे इस्त्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.