राज्यातील १४ पूल धोकादायक स्थितीत, अपघाताची शक्यता
देशात १०० ब्रिटीश कालीन पूल जीर्ण झालेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. त्याचवेळी महाराष्ट्र राज्यातील १४ पूर धोकादायक असल्याची माहीती मिळालेय.
नवी दिल्ली : देशात १०० ब्रिटीश कालीन पूल जीर्ण झालेत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील १४ पूल धोकादयक असल्याची माहिती पुढे आली आहे.
१०० पूल धोकादायक असल्याची माहिती लोकसभेत केंद्रीय रस्ते पहिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी यावेळी सावित्रीवरच्या दुर्घटनेचाही त्यांनी उल्लेख केला. भूसंपादन, अतिक्रमण आणि पर्यावरणा संदर्भातल्या मुद्द्यांमुळे पावणे चार लाख कोटींची पूल बांधणी रखडल्याचंही गडकरींनी सांगितलं.
१०० पैकी महाराष्ट्र राज्यातील १४ पूल धोकादयक असल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ब्रिटीश कालीन पूल आहेत. या पुलांच्या दुरुस्तीची मागणी याआधीच करण्यात आआली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने शुक्रवारी देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील १४७ अत्यंत जीर्ण झालेल्या आणि कधीही कोसळू शकणाऱ्या पुलांची यादी प्रसिद्ध केले आहे.
या यादीत सांगली जिल्ह्यातील ४, सोलापूर जिल्ह्यातील ३, पुणे आणि नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी २ तसेच औरंगाबाद, कोल्हापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील प्रत्येकी एका पुलाचा समावेश आहे. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरील १४ पूल कधीही कोसळू शकतील, अशा धोकादायक अवस्थेत आहेत.
धोकादायक पुलांची यादी
- सांगली
राष्ट्रीय महामार्ग क्र. १०
भोसे, लांडगेवाडी, मिरज गावातील पूल
- सोलापूर
राष्ट्रीय महामार्ग क्र. १३
बोरामणी, कळसेनगर, भीमा नदीवरील पूल
- पुणे
राष्ट्रीय महामार्ग क्र. १२
मुळा नदीवरील पूल, वारवे खुर्द पूल
- नांदेड
राष्ट्रीय महामार्ग क्र. २६
पांगरी तसेच आसना नदीवरील पूल