मेरठ : एका १०० वर्षांच्या वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये  घडली आहे. एका तरूणाने सोमवारी येथील जानी गावात दारूच्या नशेत सकाळी हे कृत्य केले.  आपल्या भावासोबत ही वृद्ध महिला गावामध्ये राहत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलात्कार करणाऱ्या अंकित पुनियाला पकडण्यात आले आहे, त्याने महिलेवर बलात्कार केला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. महिलेवर  अंकित पुनिया जबरदस्ती करत असताना ती ओरडायला लागली.


तिचा भाऊ आणि शेजारी त्या ठिकाणी महिलेचा आवाज ऐकून आले. त्यावेळी अंकित पुनियाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील लोकांनी त्याला पकडून पोलिसांकडे सोपवलं. 


पोलिसांनी अंकित पुनिया याच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल केले. मात्र, पुनियाने आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या महिलेवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान प्रकृती खालावत गेल्याने तिचा मृत्यू झाला.