दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात लवकरच मोठी भरती होणारय
CISF Recruitment 2022 : दहावी (10th) पास असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची (Job) सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) लवकरच कॉन्स्टेबल, ट्रेडसमन पदांची भरती करणार आहे. यासाठी सीआयएसएफ (CISF) लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वर अधिसूचना जारी करेल. वृत्तानुसार, सीआयएसएफच्या आगामी कॉन्स्टेबल भरतीमध्ये 700 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. अर्जदारांना अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्जदारांना शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) साठी उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाईल. (CISF Recruitment 2022)
या पदांवर मोठी भरती
सीआयएसएफ (CISF) कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी अद्याप कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही, परंतु अहवालानुसार, खाली नमूद केलेल्या पदांवर अर्ज मागवले जाऊ शकतात.
कॉन्स्टेबल/कुक
हवालदार / मोची
हवालदार / टेलर
कॉन्स्टेबल / नाभिक
कॉन्स्टेबल/वॉशर मॅन
कॉन्स्टेबल / सफाई कामगार
कॉन्स्टेबल / पेंटर
कॉन्स्टेबल/ गवंडी
कॉन्स्टेबल / प्लंबर
कॉन्स्टेबल/माळी
कॉन्स्टेबल / वेल्डर
पात्रता आणि वयोमर्यादा
वृत्तानुसार, सीआयएसएफच्या आगामी कॉन्स्टेबल भरतीमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकतील. यासाठी त्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कोणताही अभ्यासक्रम केला असेल, तर त्यांना प्राधान्य दिले जाईल. माहितीनुसार, भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 आणि कमाल 22 वर्षे असणार आहे.
निवड कशी होणार?
उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.
अर्जाचे शुल्क
सामान्य, OBC आणि EWS - 100 रुपये
SC/ST/EX साठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
अर्ज कसा कराल?
सीआयएसएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइट cisfrectt.in वर जावे लागेल.
होम पेजवर, New Registration वर क्लिक करा.
दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि नंतर सबमिट करा.
तुमची रजिस्ट्रेशन माहिती वापरून लॉग इन करा आणि Apply Part वर क्लिक करा.
यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये तुम्हाला CONSTABLE/TRADESMAN-2022 वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर विचारलेले सर्व तपशील काळजीपूर्वक भरा.
संपूर्ण तपशील भरल्यानंतर, "SAVE & PREVIEW" आणि "CLOSE" बटणे खाली दाखवली जातील. उमेदवारांनी “CLOSE” बटण वापरल्यास, त्यांना अर्ज एडिट करण्याची परवानगी दिली जाईल.
फॉर्म सबमिट करण्यापूर्वी, तो एकदा नीट तपासा. नंतर सबमिट करा.
त्यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करा.
सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर पैसे भरा.
अर्जाचे पैसे भरल्यानंतर, फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवा.