हैदराबाद : तामिळनाडूमध्ये तुतीकोरीन इथं प्रदूषण करणाऱ्या कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ११ जण ठार, तर १७ जण जखमी झाले. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे. वेदांत  कंपनीच्या "स्टरलाइट कॉपर' प्रकल्पाद्वारे भूजल प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक करतायत. कंपनीविरोधात गेल्या तीन महिन्यांहून आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा  शंभरावा दिवस असल्यानं जवळपास पाच हजार आंदोलक जमले होते. हा प्रकल्प कायमस्वरूपी बंद करण्याच्या आंदोलकांच्या मागणीकडे सरकार दूर्लक्ष करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.