नवी दिल्ली : सेना आणि अर्धसैनिक दलाच्या ११२ जणांना यावर्षी वीरता पुरस्कारांसाठी निवडलं गेलं आहे. ७१व्या स्वतंत्रता दिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. सेनेच्या दोन जवानांना आणि सीआरपीएफच्या एका कमांडंटला मरणोत्तर किर्ती चक्र पुरस्कारासाठी निवडलं गेलं आहे. यावर्षी किर्ती चक्र पुरस्कारांसाठी पाच जवानांना निवडलं गेलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार, यावर्षी किर्ती चक्रसाठी निवडण्यात आलेल्या जवानांमध्ये दोन जवान दहशतवादा विरोधी अभियानात शहीद झालेले आहेत. गोरखा रायफल्सचे हवालदार गिरीस गुरूंग, नगा रेजिमेंटचे मेजर डेविड मनलुन आणि सीआरपीएफच्या ४९ बटालियनचे कमांडंट प्रमोद कुमार यांना किर्ती चक्र घोषित करण्यात आलंय. 


यासोबतच गढवाल रायफल्सचे मेजर प्रीतम सिंह कुन्वार आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी चेतन कुमार चीता यांनाही किर्ती चक्रासाठी निवडण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावर्षी सैन्य आणि अर्धसैन्य दलातील एकूण ११२ वीरता पुरस्कारांच्या यादीला मंजूरी दिली आहे.