`तितली`नंतर पाऊस आणि भूस्खलन ओडिशात संकट, 12 लोकांचा मृत्यू
तितली चक्रीवादळाचा जोर ओसरलाय. वादळाचा जोर कमी झाल्याने ईशान्य भारताकडून ते पश्चिम बंगालच्या दिशेने सरकरलंय.
भुवनेश्वर : तितली चक्रीवादळाचा जोर ओसरलाय. वादळाचा जोर कमी झाल्याने ईशान्य भारताकडून ते पश्चिम बंगालच्या दिशेने सरकरलंय. पश्चिम बंगालमध्ये वादळाचा प्रभाव जाणवताच तिथे जोरदार पाऊस झाला. दरम्यान या वादळाच्या तडाख्यामुळे शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झालाय. यात ओडिशात 12 जणांचा तर पश्चिम बंगालमधील एकाचा समावेश आहे.
तितली चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर पाऊस आणि भूस्खलन झाल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. ओडिशात आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झालाय. दरम्यान, ओडिशात हे वादळ कमी झालेय. परंतु पश्चिम बंगालमध्ये या वादळाचा जोर वाढला. त्यामुळे पुढील 24 तासात या वादळाचा मोठा धोका पोहोचू शकतो, असा इशारा देण्यात आलाय. तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आलेय.