टॅटू काढण पडलं महागात, तरूणांना झाला `हा` गंभीर आजार
टॅटू आर्टिस्टची `ती` एक चुक, 12 रूग्णांना एचआयव्हीची बाधा, वाचा संपूर्ण प्रकरण
बनारस : टॅटू काढण्याचा सर्वांनाच शौक असतो, मात्र एखाद दुसरा याला अपवाद असेल. मात्र हाच शौक काही तरूणांना महागात पडलाय. टॅटू काढल्यामुळे या तरूणांना गंभीर आजार झाल्याची घटना घडलीय. हा आजार एकूण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. दरम्यान डॉक्टरांनी जेव्हा या रूग्णांना आजाराची माहिती दिली, तेव्हा रूग्णांना मोठा धक्का बसला आहे.
उत्तर प्रदेशच्या बनारसमधील काही तरूणांनी हाता पायावर टॅटू गोंदवले होते. टॅटू काढल्यानंतर या सर्व लोकांना ताप आणि अशक्तपणाचा त्रास होत होता. यावर औषध घेऊनही शरीरावर काहीच असर होत नव्हता. तसेच या तरूणांचे हळूहळू वजनही कमी होत होते. त्यामुळे दिवसेंदिवस तरूणांचा तबियत खालावत होती.
इतके उपचार घेऊन सुद्धा प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी एचआयव्ही चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. या चाचणीनंतर तरूणांना एचआयव्हीची बाधा झाल्याची माहिती मिळाली. तब्बल 12 जणांना एचआयव्हीची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये 10 मुले आणि दोन मुलींचा समावेश आहे.
हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, संसर्ग झालेल्या सर्व लोकांनी नुकतेच टॅटू काढले होते. त्यानंतर या सर्व लोकांना सतत तापासोबत अशक्तपणा येत होता. सर्वांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह आला. या सर्व बाधितांनी फेरीवाले किंवा जत्रेत टॅटू काढल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. संक्रमित सुईचा वापर केल्याने सर्वांना एचआयव्हीची लागण झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
अशी काळजी घ्या
तज्ज्ञांच्या मते, टॅटू काढताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, टॅटू आर्टिस्टला इन्फेक्शन होणार नाही याची कशी काळजी घेतोय. तसेच एकदा वापरलेली सुई पुन्हा वापरत नाही ना याकडेही लक्ष दिले पाहिजे. अनेकदा टॅटू आर्टिस्ट सुयांच्या किंमतीमुळे एकाच सुईने एकापेक्षा जास्त व्यक्तींचे टॅटू बनवतात. ज्यामुळे संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्यापर्यंत सहज पसरतो. त्यामुळे टॅटू आर्टिस्ट वापरत असलेली सुई नवीन आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी.