उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या काळात गेल्या ११ महिन्यात साधारण १३५० एनकाऊंटर केले गेले. याचा अर्थ महिन्याला शंभरहून अधिक एनकाऊंटर झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ३०९१ फरार आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. यातील ५० टक्के आरोपींवर बक्षीस लागू होतं, पोलीस यांच्या शोधात होते असं उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितलं.


आरोपींनी स्वत:चा जामीन रद्द केला 


 उत्तर प्रदेश पोलिसांच्या या आकड्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे. १० महिन्यात ५४०९ गुन्हेगारांनी न्यायालयातून मिळणारा जामीनच रद्द केलाय.


बाहेर येऊन गोळी खाण्यापेक्षा आत राहण त्यांना सुरक्षीत वाटत असाव. युपी पोलिसांच्या बंदूका चालत नाहीत का अस कधी काळी विचारल जाचय. पण आता यातून दणादण गोळ्या बाहेर पडायला सुरूवात झालीय असं म्हटल


इन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह 


युपी पोलिसांकडून सुरू असलेल्या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले जात आहेत.


यूपीतील राज्य मानवाधिकार आयोगाने गुन्हेगार आणि पोलिंसाच्या चकमकीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोणताही गुन्हा नसताना पोलिसांनी खोटे इन्काऊंटर केल्याचा आरोप मारल्या गेलेल्यांच्या नातेवाईकांनी केलाय.