काझिरंगा : उत्तर भारतातल्या पुराचं विदारक दृष्य समोर आलंय... आसामच्या काझिरंगा अभयारण्यात १४० प्राण्यांचे मृतदेह आढळून आलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा आसामला दुसऱ्यांदा पुराचा फटका बसलाय. त्यामुळे ४८१ चौरस किलोमीटर भूभागात पसरलेल्या या अभयारण्याचा ८० टक्के भाग पुराच्या पाण्याखाली गेलाय. 


१० पाणघोडे, १२२ हरणं, दोन हत्ती, तीन जंगली अस्वलं, तीन सांबर यांचे मृतदेह आतापर्यंत आढळलेत. १० ऑगस्टपासून दररोज प्राण्यांचे मृतदेह सापडत असल्याचं काझिरंगातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. युनेस्कोचा जागतिक ठेवा असलेल्या काझिरंगा अभयारण्यात डिलफू या नदीचं पाणी शिरलंय.