Shocking News : नवीन वर्षाच्या सूरूवातीला अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. कारण नवीन वर्षाच्या उत्साहाच्या भरात तरूणाई काहीही करायला तयार असते.त्यामुळे अनेकदा उत्साहात अपघाताच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका तरूणाचा गंभीर अपघात (Accident) झाला होता. या अपघातामुळे अगदी तो मरणाच्या दारात पोहोचला होता. मात्र डॉक्टरांनी (Doctor) तब्बल 8 तास शर्थीचे प्रयत्न करून तरूणाचे प्राण वाचवले आहे.


नेमकी घटना काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी एक 20 वर्षीय तरूण त्याच्या कार्यालयातून घराकडे निघाला होता. परंतू घरी पोहोचण्यापूर्वीच त्याच्या दुचाकीला (Bike Accident) अपघात झाला होता. या अपघातात तरूणाची बाईक एका भरधाव ट्रकला धडकली होती. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याची अवस्था इतकी वाईट होते की तो वाचेल की नाही, हे देखील सांगता येत नव्हते.   


पोलिसांनी नेले रूग्णालयात


पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ गाठून तरूणाला रूग्णालयात नेले होते. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने नंतर त्याला दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital Delhi) पाठवण्यात आले होते. या रूग्णालयात एका सर्जन टीमने त्याच्यावर उपचार केले होते.


10 डॉक्टरांच्या पथकाने वाचवले प्राण


 'रुग्णाची प्रकृती खूपच खराब होती. त्याच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली होती. जबडा निखळला होता आणि चेहरा आणि डोक्याच्या सुमारे 16 प्रमुख हाडांमध्ये फ्रॅक्चर होते. तोंडाची हाडं तुटली होती तर जीभेचे दोन तुकडे झाले होते, असे गंगाराम हॉस्पिटलचे (Sir Ganga Ram Hospital Delhi) प्लास्टिक सर्जन डॉ. भीम सिंह नंदा यांनी सांगितले. 


दरम्यान तरूणाचे प्राण वाचवण्यासाठी मध्यरात्रीच 10 डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छवासावर जिवंत ठेवण्यात आले,त्यानंतर न्यूरोसर्जनने पदभार स्वीकारला.  जेव्हा रुग्ण थोडासा स्थिर झाला, तेव्हा जखमांची व्याप्ती निश्चित करण्यासाठी अनेक स्कॅन ताबडतोब केले गेले. रुग्णाच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली होती आणि चेहऱ्याची हाडे चिरडली गेली होती आणि त्यात अनेक फ्रॅक्चर झाले होते, असे न्यूरोसर्जन डॉ. श्रेय जैन यांनी सांगितले. 


सहा प्लेट आणि दोन डझन स्क्रूने फ्रॅक्चर जोडलं


डॉक्टरांनी रुग्णाच्या चेहऱ्याच्या त्वचेवर कोणताही कट न करता सर्व फ्रॅक्चर जोडलं. यानंतर टायटॅनियम प्लेट्स आणि स्क्रूच्या मदतीने सर्व फ्रॅक्चर (Fracture) एक-एक करून बसवण्यात आले. या प्रक्रियेत सुमारे 6 प्लेट आणि दोन डझन स्क्रू वापरण्यात आले. नंतर जीभ आणि खालच्या आणि वरच्या ओठ, नाक आणि पापण्यांसह इतर मऊ उतींना झालेल्या जखमांची दुरुस्ती केली गेली.


दरम्यान डॉक्टरांनी जवळपास 8 तास शस्त्रक्रिया (Operation) करून तरूणाचे प्राण वाचवले.सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.लवकरच त्याला डिस्चार्ज मिळणार आहे.