खोट्या नोटांमुळे ज्योतिषाचेच ग्रह फिरले
हैदराबादच्या नगोल येथे राहण्याऱ्या या ज्योतिषाचे नाव मुरलीकृष्ण शर्मा असे आहे.
हैदराबाद : तेलंगणामधील एक धक्कादायक प्रकार येथील पोलीसांनी उघड केला आहे. येथील एका ज्योतिषाच्या घरातून पोलीसांनी तब्बल 18 कोटी रुपयांच्या नकली नोटा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. खरेतर या जोतिषाने आपल्या घरात चोरी झाली असल्याचे पोलीसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी त्याचाच भांडा फोडला.
हैदराबादच्या नगोल येथे राहण्याऱ्या या ज्योतिषाचे नाव मुरलीकृष्ण शर्मा असे आहे. शर्मा हे यानेटिव्ही चॅनेलवर माणिक रत्नविक्री आणि ज्योतिष शास्त्र सांगायचे. त्यानंतर त्यांनी 2019 पासून नकली नोटांचा धंदा सुरू केला. यापूर्वीही त्यांनी बँक अधिकाऱ्यांच्या मदतीने जवळजवळ 90 कोटी रुपयांची अफरातफरी केली होती. यासाठी सीबीआयने त्यांना अटक देखील केली होती. परंतु नंतर त्याला जामीनावर सोडण्यात आले. परंतु ऐवढ्यावर तो न थांबता त्याने पुन्हा आपला धंदा सुरुच ठेवला.
त्यानंतर त्याने पोलीसांकडे आपले पैसे चोरीला गेले असल्याची तक्रार दिली. पण तो स्वत:च त्यामध्ये अडकला. कारण चौकशीदरम्यान हैदराबाद क्राईम ब्रँच आणि एलबी नगर पोलिसांना बनावट नोटा मिळाल्या, ज्याची किंमत जवळजवळ 18 लाख रुपये आहे.
15 जून रोजी शर्मायानेएल. बी. नगर भागातील पोलीस ठाण्यात घरातील 40 लाख रुपये किंमतीचे रत्न चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले.
त्यावेळी, पोलिसांना पवनकुमार नावाचा व्यक्ती त्यामध्ये दिसला. जो या आधी बेलमकोंडाचा सहकारी होता. पवनकुमारला बेलमकोंडा याच्या लक्झरीयस लाईफची आणि संपत्तीची भुरळ पडली होती. त्यामुळे, त्याने आपल्या गावातील मित्रांना बोलावून 14 जून रोजी रात्री ज्योतिषाच्या घरी चोरी केली. त्याने घरातील 2 ट्रॉली बॅग चोरी केल्या होत्या. मात्र, हैदराबादच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना बॅगेतील फक्त 16 नोटा म्हणजे 32 हजार रुपये खरे मिळाले आणि उरलेल्या नोटा बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे, त्यांनी त्या नोटा जाळून टाकल्या आणि अन्गुंटूगुंटूरला निघून गेले.
त्यानंतर पवनकुमारनेला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा चौकशीदरम्यान त्याने पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी सांगितले की, त्यात काही नोटा बनावट होत्या. पोलिसांनी अधिक तपास केला असता, त्यांना शर्माच्या यापूर्वीच्या 90 कोटी रुपयांच्या अफरातफरीची माहिती मिळाली. पोलिसांनी शर्माबद्दल अधी चौकशी केल्यानंतर त्याच्या या धंद्यबद्दल समजले आणि तेव्हा पोलिसांनी शर्माकडून 17 कोटी 72 लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या, यासोबतच 6 लाख 32 हजार कॅश आणि 10 मोबाईल फोनही त्याच्याकडून जप्त करण्यात आले.