नवी दिल्‍ली: अमरनाथ यात्रा दरम्यान दहशतवादी कारवाया करण्यासाठी लश्‍कर-ए-तैयबाचे जवळपास 18 दहशतवादी पाक अधिकृत काश्‍मीरमधून घुसखोरी करुन भारतात दाखल झाले आहेत. जम्‍मू-काश्‍मीरमधील गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षारक्षकांना अलर्ट केलं आहे. घुसखोरी करुन आलेले दहशतवादी कंगनमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे. सुरक्षा रक्षकांनी जम्‍मू आणि काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरु झाला आहे. जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आजुबाजुच्या भागात जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जंगलातून जाणाऱ्या मार्गावर जवांनाची भींत तयार करण्याचा विचार सुरु आहे. ज्यामुळे दहशतवादी लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरमध्ये होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या आधी गृह मंत्रालयाला पाठवलेल्या रिपोर्टमध्य़े म्हटलं आहे की, काश्मीरमध्ये जवळपास 18 लश्करचे दहशतवादी घुसखोरी करुन आले आहेत. या दहशवताद्यांचा कॉल इंटरसेप्ट केल्यानंतर माहिती मिळाली आहे की, हे दहशवतादी अमरनाथ यात्रेच्या रस्त्यावर येणाऱ्या कंगनमध्ये दहशतवादी हल्ला करणारप आहेत. 


दहशतवाद्यांचा 12 जणांचा ग्रुप हा हल्ला करतील. 10 जूनला पीओकेमधून हे काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. तर दहशतवाद्यांच्या दुसऱ्या ग्रुपने 20 जूनला घुसखोरी केली आहे. यामध्ये 6 दहशतवादी आहेत. गृह मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या रिपोर्टनुसार POKच्या "KeL लॉन्च पॅड"वरुन या दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानचा गुप्तचर विभाग ISI ने मदत केली आहे.


पहिल्यांदाच केंद्र सरकारने एनएसजी कमांडोज जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात केले आहेत. एनएसजीच्या स्पेशल अॅक्शन ग्रुप, अँटी हाइजॅकिंग आणि अँटी टेरर टीम कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशनसाठी तयार आहे.