नवी दिल्ली : तीन तरुणांनी एका १८ वर्षीय तरुणीला जिवंत जाळल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात ही घटना घडली असून आरोपी तरुणांनी रॉकेल टाकून या तरुणीला जिवंत जाळले आहे. या घटनेत पीडित तरुणी ४० टक्के भाजली आहे.


पीडित तरुणीने आरोप केला आहे की, सचिन गुप्ता, आशिष गुप्ता आणि पंचम सिंह या तिघांनी बुधवारी (१३ डिसेंबर) रोजी अंगावर रॉकेल टाकून मला पेटवून दिलं. 


इतकचं नाही तर, आरोपी तिनही तरुण हे तिच्यावर शारीरिक अत्याचार करत होते असा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.


या घटनेनंतर जखमी तरुणीला इटावा येथील रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आली आहे. तर, आरोपी तरुणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे. 


तर, दुसरीकडे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात १८ वर्षीय तरुणी कॉलेजमधून घरी परतत असताना तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर या परिसरात तनावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. श्याम गावात १२वी इयत्तेत शिकणारी तरुणीची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती.


पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी पोलिसांनी अमरपाल गुज्जर आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. गावातील तणावपूर्ण वातावरण पाहता अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.