विद्यार्थिनीच शिक्षिकेवर प्रेम... आईने विरोध केला म्हणून टाकलं मारून
कवीनगरमध्ये एक धक्कादायक बाब घडली आहे.
गाजियाबाद : कवीनगरमध्ये एक धक्कादायक बाब घडली आहे.
मुलीने शिक्षिकेसोबत मिळून आपल्याच आईची हत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनीच्या वडिलांनी दोघांच्या विरोधात हत्या केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. वडिलांचं असं म्हणणं आहे की, शिक्षिकेने माझ्या मुलीला या सर्व प्रकरणात अडकवलं आहे.
काय आहे प्रकार
माझी मुलगी अनेक काळापासून त्या शिक्षिकेसोबत शिकत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांमध्ये एक वेगळंच नातं पाहायला मिळालं. माझी मुलगी गेले कित्येक दिवस घर सोडून त्या शिक्षिकेसोबत राहत आहे. या प्रकरणाबाबत मी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. मात्र त्यांनी तडजोड करून हा विषय थांबवला.
9 मार्चची घटना
या रात्री दोषी विद्यार्थिनी आणि तिच्या आईत काही कारणामुळे वाद झाला. या वादा दरम्यान विद्यार्थिनीने आपल्या आईवर एक सामान फेकलं. ज्यामध्ये विद्यार्थिनीची आई गंभीर जखमी झाली. यावेळी विद्यार्थिनीसोबत तिची शिक्षिका देखील उपस्थित होती. काही वेळाने छोटी बहिण आली तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तात्काळ आईला रूग्णालयात दाखल केलं मात्र 11 मार्च रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.