बलिया : सोशल मीडियामुळे जूने मित्र भेटतात आणि नवीन लोकांशी मैत्री होते. सोशल मीडियाचे अनेक सकारात्मक उपयोग असताना त्याचा वाईट वापर होताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे होणारे अत्याचार, हत्या या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून समोर येत आहे. त्याचे झाले असे...


ती फेसबुक पोस्ट ठरली जीवघेणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बलियाच्या उभांव ठाण्याअंतर्गत शेखपूर गावात राहणाऱ्या एका १९ वर्षाच्या मुलीचा फोटो तिच्या प्रियकराने फेसबुकवर अपलोड केला. ते पाहुन तिने विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रियकरासोबतचा फोटो फेसबुकवर अपलोड केल्याने गावात तिची खूप नाचक्की झाली. या प्रकरणाचा मनावर गंभीर आघात झाल्याने तिने विहीरीत उडी घेतली. तिला बाहेर काढेपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.


सोशल मीडियामुळे आत्महत्या


सोशल मीडियाचा वापर तरुणाईत वाढत आहे. मात्र याचा योग्य वापर केल्यास तुम्ही यश संपादन करु शकता. तर गैरवापर जीवघेणा ठरू शकतो.



मृत मुलीच्या आईने केला खुलासा


मृत मुलीच्या आईने सांगितले की, प्रियकराने खांद्यावर हात टाकून फोटो काढला होता. तो फोटो त्याने फेसबुकवर अपलोड केल्याने ती मुलगी खजिल झाली आणि तिने आत्महत्येचा पर्याय निवडला.