नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली विधानसभेत आपला बहुमत आहे. त्यामुळे आपकडून राज्यसभेसाठी तिघांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेवर पाठवण्यात येणा-या नावांची आपमध्ये जोरदार चर्चा आहे. या चर्चांमधून रघुराम राजन यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजतंय. मात्र यावरुनही आपमध्ये दोन भिन्न मतप्रवाह आहेत. राज्यसभेच्या जागांवरुन कुमार विश्वास आणि मनिष सिसोदिया, अरविंद केजरीवाल असे दोन गट पडल्याचे सांगण्यात येते. 


आपचे नेते कुमार विश्वासही राज्यसभेसाठी इच्छुक आहेत. याशिवाय आपचे प्रवक्ते आशुतोष आणि संजय सिंह हेसुद्धा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी रेसमध्ये आहेत. जानेवारी 2018 मध्ये राज्यसभेच्या दिल्लीमधील तीन जागा भरल्या जाणार असून विधानसभेत बहुमत असल्यामुळे या तिन्ही जागा आम आदमी पक्षाला मिळणार आहेत. आता रघुराम राजन यांना आपने खरेच राज्यसभेची संधी दिली तर ते त्यावर कोणता निर्णय देतात याकडं नजरा लागल्या आहेत.