गुजरात आणि हिमाचलमध्ये कोणाला करायचं मुख्यमंत्री हे २ नेते ठरवणार
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.
अहमदाबाद : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. दोन्ही जागी भाजपने बहुमत मिळवलं आहे.
भाजपला बहुमत
भाजप गुजरातमध्ये सहाव्यांदा सरकार बनवणार आहे. तर काँग्रेसला मोठ्या अंतराने पराभूत करत हिमाचल प्रदेशमध्ये देखील भाजपने सत्ता मिळवली आहे. दोन्ही विजयानंतर पंतप्रधान मोदी खूप उत्साहित दिसत आहे. आता भाजप दोन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री कोणाला करायचं याची निवड करणार आहे.
कोण ठरवणार मुख्यमंत्री
मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत चर्चा झाली. बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये २-२ नेते पाठवून निर्णय घेण्यात येणार आहे. अरुण जेटली आणि भाजपचे खासदार सरोज पांडे गुजरातमध्ये तर नरेंद्र तोमर आणि निर्मला सीतारामन हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाच्या आमदारांना भेटणार आहेत आणि मुख्यमंत्र्याची निवड करणार आहे.
कोण होणार मुख्यमंत्री
गुजरातमध्ये विजय रुपाणी हे मुख्यमंत्री पदावर पुन्हा कायम राहू शकतात. हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकुर यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं. कारण भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल सुजानपूर सीटवर निवडणुकीत पराभूत झाले आहेत.