आताची मोठी बातमी! देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?
2 हजारांच्या नोटेमुळे काळाबाजार वाढला, नोटेवर बंदी घालण्याची राज्यसभेत मोदींची मागणी, गेल्या काही दिवसांपासून बाजारातही 2 हजार रुपयांची नोट झालीय दुर्मिळ
2 Thousand Note Ban : 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणल्यानंतर आता 2000 रुपयांची नोट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. 2 हजार रुपयांच्या नोटांचा गुन्हेगारी कारवाया आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचा आरोप करत 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार (Rajyasabha MP) सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी सभागृहात शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला.
'गेल्या काही दिवसांपासून बाजारात गुलाबी रंगाच्या 2,000 रुपयांच्या नोटा दुर्मिळ झाल्या आहेत. एटीएममधूनही (ATM) 2 हजार रुपयांची नोट मिळत नाही, त्यामुळे 2 हजार रुपयांची नोट आता वैध नाही अशी अफवा पसरवली जात आहे. सरकारने या संदर्भात परिस्थिती स्पष्ट करण्याची करावी अशी मागणी सुशील मोदी यांनी केली आहे.
2016 मध्यो झाली होती नोटबंदी
8 नोव्हंबर 2016 रोजी केंद्र सरकारने (Central Goverment) नोटबंदीची (Demonetisation) घोषणा केली होती. याअंतर्गत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अवैध घोषीत करत चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. या नोटांच्या बदल्यात सरकारने 500 च्या नविन आणि 2000 हजार रुपयांची नोट बाजारात चलनात आणली. पण भाजप खासदार मोदी यांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्या वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 हजार रुपायांच्या नोटेची छपाई बंद केली आहे. तसंच 2 हजारांच्या नकली नोटाही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणावर 2 हजाराच्या नोटांचा साठा केला आहे. त्याचा वापर केवळ अवैध धंद्यात होत आहे. काही ठिकाणी 2 हजारांच्या नोटा ब्लँकने विकल्या जात आहेत.
बेकायदेशीर व्यवसायात वापर
अंमली पदार्थ (Narcotics), मनी लाँड्रिंग (Money Laundering) आणि दहशतवादासाठी (Terrorism) वित्तपुरवठा यासह अनेक गुन्ह्यांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. जगातील सर्व आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या नोटांचे चलन थांबलं आहे. बलाढ्य अमेरिकेतही 100 डॉलरची नोट चलनात आहे, 1000 डॉलरची नोट दिसत नाही. चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशातही नोटांचं कमाल मूल्य 200 पर्यंतच आहे. केवळ पाकिस्तान आणि श्रीलंका सारख्या देशांमध्ये 5,000 रुपयांच्या नोटा आहेत तर इंडोनेशियामध्ये 1 लाख रुपयांच्या नोटा चलनात असल्याची माहिती सुशील कुमार मोदी यांनी दिली.
भारतात डिजीटल व्यवहार
भारतात सरकार डिजिटल व्यवहारांवर (digital transactions) भर देत आहे. त्यामुळे तसंही 2000 हजार रुपयांच्या नोटेला अर्थ नाही. त्यामुळे सरकारने हळुहळु 2 हजार रुपयांची नोट चलनातून बंद करावी अशी मागणीही सुशील कुमार मोदी यांनी केली आहे. सरकारने लोकांना वेळ द्यावा म्हणजे ते आपल्या जवळच्या 2 हजार रुपायांच्या नोटा इतर नोटांमध्ये बदलून घेऊन शकतात. काळाबाजारावर रोख लावायचा असेल तर 2 हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणावी अशी मागणी सुशील कुमार मोदी यांनी केलीय.
2 हजारांच्या नोटेची छपाई कधीपासून बंद?
आर्थिक वर्ष 2017-18 दरम्यान 2 हजार रुपयांच्या नोटा सर्वाधिक चलनात होत्या. त्यावेळी 33,630 लाख नोटा बाजारात होत्या. ज्याचं मूल्य जवळपास 6.72 लाख करोड इतकं होतं. 2021 मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभत माहिती देताना सांगितलं होतं, गेल्या दोन वर्षात 2 हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही. रिझर्व्ह बँकेनेही 2019 पासून 2000 रुपयांची नोटेची छपाई झाली नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळेच सध्या बाजारात 2 हजार रुपायांच्या नोटेचा मोठा तुटवडा भासत आहे.