`आप`च्या २० आमदारांच्या निलंबनावर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब
लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय.
नवी दिल्ली : लाभाचं पद आपच्या आमदारांना चांगलंच भोवलंय. आम आदमी पार्टीच्या २० आमदारांचं पद रद्द करण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या शिफारशीला राष्ट्रपतींनी मंजूरी दिलीय.
केंद्रीय कायदा मंत्रालयाने याबाबत पत्रक जारी केलंय. यापूर्वी या कारवाईला आव्हान देत सात आमदारांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र न्या. गीता मित्तल यांनी या आमदारांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. २० आमदारांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतरही दिल्लीतील केजरीवाल सरकारवर कोणतंही संकट नाही.
७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेत आपचे ६६ आमदार आहेत. तरीही नैतिकतेच्या आधारावर केजरीवाल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप आणि काँग्रेसने केली होती.