घरी चिमुकल्या पाऊलांनी लेकीचं आगमन झालंय, गौरी आणि देवी पार्वतीच्या नावावरून ठेवा गोंडस नाव
Baby Girl Names And Meaning : गणेशोत्सवाच्या काळात घरी लेकीचा जन्म झालाय. मुलीला ठेवा गौरीच्या नावावरून गोंडस नावे.
Hindu Baby Girl Name on Goddess Gauri : गेल्या १० दिवसांपासून सगळीकडे भक्तीभावाचं वातावरण आहे. गणरायासोबतच भाविक गौरीचं आगमन देखील अतिशय आनंद आणि प्रेमाने स्वागत करण्यात आलं. गौरी-गणपतीची या काळात मनोभावे पूजा केली जाते. जर याच काळात तुमच्या घरी देखील लेकीचं आगमन झालं असेल तर मुलीला गौरीच्या नावावरून द्या अतिशय गोड नावे. यामुळे सतत गौरी-गणपतीचं स्मरण राहिल एवढंच नव्हे तर मुलीवर देखील बाप्पाचा कृपाशिर्वाद राहिल.
काही दिवसांपूर्वी गायक राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या घरी चिमुकलीचं आगमन झालंय. या दोघांचं हे पहिलंच मुलं आहे. या दोघांप्रमाणेच तुमच्या घरी देखील चिमुकलीचं आगमन झालं असेल तर तुम्ही या २० नावांवरून मुलींची नावे निवडू शकता. पालकांना कायमच आपल्या मुलांना नावे ठेवणे हा खास सोहळा असतो. या नावानेच उद्या संपूर्ण जग मुलांना ओळखणार आहे. पालक कायमच मुलांसाठी अनोखी आणि हटके नावे शोधत असतात. अशावेळी तुम्ही मुलीकरिता ही नावे निवडू शकता.
गौरी आणि देवी पार्वतीच्या नावावरून मुलींसाठी नावे निवडली तर त्यांचा कृपाशिर्वाद देखील मुलीवर राहिल. बाळाच्या नावावरून तुम्हाला परमेश्वराचं, गणरायाचं स्मरण राहिल यात शंका नाही.
गौरीच्या नावावरून मुलींची नावे
गोद्विका - देवी गौरीचे प्रतिक
गौरी - गौरीचे नाव
गोरोचना - गौरी आणि पार्वतीचे नाव
गौरिका - गौरीसारखी तसेच श्रीशंकराचे एक अनोखे नाव
पार्वतीच्या नावावरून नावे
आर्या - देवीचा पार्वतीचे परोपकारी रुप म्हणजे आर्या
ऐशानी - शक्तीचे प्रतिक, देवी पार्वतीचे एक रुप
अनिका - पार्वतीचे तेज आणि सुंदर चेहरा असलेले अनिका
भव्या - देवी पार्वतीप्रमाणे पुण्यवान मुलगी
दक्षियानी - राजा दक्षची कन्या
मुलींची नावे
ईशा - पार्वतीचे देवी स्वरूप नाव
गायत्री - देवी पार्वतीचे रुप
हिमानी - हिमनगामध्ये जन्मलेली देवी पार्वती
इशी - देवी पार्वतीचे सुंदर नाव
कन्यका - देवी पार्वतीचे नाव
५ मुलींची नावे
कौशिकी - देवी पार्वतीचे व दुर्गेचे नाव
महाश्वेता - गौरीचे चार अक्षरी नाव
यती - गौरीचे नाव
तारिणी - तारण करणारी, देवी पार्वतीप्रमाणे अखंड सोबत असलेली
स्तुती - देवी पार्वतीचे एक रुप