Gold & Silver Rate: सोन्याच्या दरामध्ये ऐतिहासिक वाढ; चांदीही चमकली! जाणून एका तोळ्याचे दर
Gold Silver Rate Today 20 January 2023: आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली असून अंतरराष्ट्रीय बाजापेठेमध्येही सोन्या चांदीच्या दरांमध्ये वृद्धी झाल्याचं दिसून येत आहे.
Gold price today, 20 January 2023: जागतिक बाजारपेठेमध्ये आज सोने (Gold Rate) आणि चांदीच्या किंमतींमध्ये (Silver Rate) मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाल्याचं दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 150 रुपयांनी वाढला आहे. आजचा सोन्याचा दर (फेब्रुवारी वायदा) 56 हजार 696 इतका आहे. आजचा सोन्याचा सर्वोच्च दर हा 56 हजार 746 रुपये प्रति 10 ग्राम इतका आहे. एमसीएक्स चांदीचा दर (मार्च वायदा) 371 रुपयांनी वाढला. चांदीचा आजचा दर 68 हजार 730 रुपये इतका आहे. गुरुवारी एमसीएक्स सोन्याचा दर 56 हजार 546 रुपयांवर असताना व्यवहार थांबले होते. तर एमसीएक्स चांदीचा दर 68 हजार 359 हजार इतका होता.
जागतिक बाजारपेठेतही मोठी वाढ
जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ दिसून आली. हाजिरा सोन्यात 20.80 डॉलरची वाढ झाली. प्रति औंस (एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम) 1 हजार 927.81 डॉलर इतका आहे. तर हाजिर चांदीचा दर 0.37 डॉलरच्या वृद्धीसहीत 23.87 डॉलर प्रति औंस इतका आहे.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार जारी करण्यात आलेले सोन्या आणि चांदीचे भारतामधील प्रमुख शहरांतील भाव खालील प्रमाणे
शहरांनुसार सोन्याचे दर कसे?
मुंबई, कोलकाता, हैदराबाद, केरळ, पुणे, विजयवाडा, भुवनेश्वर, कटक, अमरावती, गुंटूर, काकीनाडा, तिरुपति, कडप्पा, अनंतपूर, वारंगल, विशाखापट्टनम, निजामाबाद, राउरकेला, सोलापूर, कोल्हापूर आणि संभळपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार रुपये प्रति तोळा इतका आहे. दिल्ली, जयपुर, लखनऊ, चंडीगड, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 150 रुपये प्रति तोळा इतका आहे. चेन्नई, कोइम्बतूर, मदुराई, सलेम, वेल्लोर, त्रिची आणि तरुनेलवेलीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 52 हजार 900 रुपये प्रति तोळा इतका आहे. तर भिवंडी, लातूर, वसई-विरार आणि नाशिकमध्ये हाच दर 52 हजार 30 रुपये तोळा इतका आहे. पाटना, मेंगळुरु, दावनगिरी, बेल्लारी आणि मैसूरमध्ये हा दर 52 हजार 50 रुपये इतकी आहे.
चांदीचे दर किती?
मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, वडोदरा, अहमदाबाद, जयपुर, लखनऊ, पटना, नागपूर, चंडीगड, नाशिक, सूरत, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूरमध्ये चांदीचा दर 72,100 रुपये प्रति किलो इतका आहे. चेन्नई, कोइम्बतूर, मदुराई, सलेम, वेल्लोर, त्रिची, सलेम, वेल्लोर, नेल्लोर, संभळपूर, कटक, गुंटूर, कडप्पा, खम्मम, विशाखापट्टनम, राउरकेला, वारंगल, दावनगिरी, बेल्लारी, बरहमापूर, अनंतपूर आणि तरुनेलवेलीमध्ये मध्ये चांदीचा दर 73 हजार 500 रुपये प्रति किलो इतका आहे.