९०० रुपयांना विकल्या जात आहेत २००० रुपयांच्या नोटा
सरकारने गेल्यावर्षी 2000 रुपयांच्या नव्या नोटा आणल्या होत्या. या दोन हजाराच्या बनावट नोटा देखील छापल्या जात आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी काशिदने सांगितलं की, त्याला 600 रुपयांत नोट मिळायची आणि तो ती 900 रुपयांत विकायचा.
नवी दिल्ली : सरकारने गेल्यावर्षी 2000 रुपयांच्या नव्या नोटा आणल्या होत्या. या दोन हजाराच्या बनावट नोटा देखील छापल्या जात आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी काशिदने सांगितलं की, त्याला 600 रुपयांत नोट मिळायची आणि तो ती 900 रुपयांत विकायचा.
पाकिस्तानात छापल्या जातात नोटा
बनावट नोटांवर एकाच नंबरच्या अनेक नोटा छापल्या जायच्या. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये या नोटा छापल्या जात असल्याचं आरोपीने सांगितलं. या नोटा बांगलादेश मार्गे भारतात आणल्या जात आहेत. पाकिस्तानात नकली भारतीय नोट छापल्या जात असल्याचा संशय आहे.
एकाच सिरीअल नंबरच्या नोटा
330 दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांमध्ये 250 नोटा या एकाच नंबरच्या आहेत. तर 80 नोटा वेगळ्या नंबरच्या आहेत. 6 लाख 60 हजाराच्या या नोटा आहेत. याची ओळख करणे देखील अवघड आहे.
२ कोटींच्या नोटा चलनात
दोन हजार रुपयांच्या बनावट नोट छापणे सुरु झाले आहे. तेव्हापासून काशिदने भारतात सुमारे 2 कोटी रुपयांच्या नोटा आणल्या आहेत. सीमा पार करण्यासाठी बनावट नोटांना भरलेल्या गोण्या बांगलादेशहून भारताच्या सीमाभागात टाकल्या जातात.
४ राज्यांमध्ये वापरल्या बनावट नोटा
सीमावर्ती भागात जेथे सुरक्षा इतकी कडक नाही आहे तेथून या नोटा भारतात आणल्या जातात. यूपी, बिहार आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये यांचा वापर केला गेला आहे. त्यापैकी दिल्लीमध्ये मोठ्य़ा प्रमाणात नोटा दिल्या गेल्या आहेत.