भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत दिसू लागल्यानंतर, सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची खलबतं सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्या घरी बैठक होत आहे. या बैठकीला दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य सिंधिया देखील उपस्थित आहेत. या बैठकीत मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा देण्यात यावा, कुणावर ही जबाबदारी सोपवावी यावर ही खलबतं सुरू आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ यांचं नाव देखील चर्चेत आहे, पण आणखी युवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यायचा असेल, तर ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या देखील नावाचा विचार होण्याची शक्यता वाढली आहे, कारण राजस्थानातही सचिन पायलट यांच्या सारख्या युवा नेत्याच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वाढली आहे. 


सचिन पायलट यांचे वडील ज्याप्रमाणे काँग्रेसचे नेते होते, त्याप्रमाणे ज्योतिरादित्य सिंधिया यांचे वडील माधवराव सिंधिया देखील काँग्रेसचे विश्वासू नेते होते. दुर्देवाने माधवराव सिंधिया आणि राजेश पायलट या काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचा अपघाती मृत्यू झाला होता.


आता या नेत्यांच्या मुलांना राहुल गांधी युवा नेतृत्व म्हणून, नेतृत्व करण्याची संधी देतात का? याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी कमलनाथ यांचं नाव देखील चर्चेत आहे.


निकाल LIVE पाहा  http://zeenews.india.com/marathi/live​ वर क्लिक करा.