सिरसा : न्यायालयाने बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सर्च ऑपरेशन राबविण्यास मंजूरी दिली आहे. न्यायालयाचे आदेश मिळताच पोलिसांनी बाबाचा सिरसा येथील डेऱ्यात तपास करण्यासाठी चोख व्यवस्था केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉग स्क्वाड आणि बॉम्ब निरोधक टीम बाबाच्या डेऱ्यात पोहोचली आहे. मात्र, बाबाच्या डेऱ्याला कुलूप आहे. त्यामुळे हे कुलूप तोडण्यासाठी हरियाणा पोलिसांनी चक्क २२ लोहार आणि टेक्निकल टीमला पाचारण केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बाबाचा डेरा फोडण्यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था केली असली तरी, न्यायालयाने ठरवून दिलेले पथक आल्याशिवाय बाबाच्या डेऱ्यात प्रवेश केला जाणार नाही. सर्व प्रकारच्या चौकशीसाठी डेरा सहकार्य करेन, असे डेराकडून पोलिसांना दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.


बाबाच्या डेऱ्याची चौकशी करण्यासाठी ५० स्पेशल कमांडो बोलविण्यात आले आहेत. सोबतच बुलेट प्रुप गाड्या, डीप मेटल डिटेक्टर टीम आणि तब्बल ३६ अधिकाऱ्यांचे बॉम्ब शोधक पथक सर्च टीममध्ये सहभागी आहे. याशिवाय ३७ स्कॉड  कमांडोची टीमही तैनात करण्यात आली आहे. डेरासर्च सुरू असतानाचे पूर्ण शुटिंग केले जाणार आहे. न्यायालयाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त न्यायाधीश अनिल कुमार पवार हे या सर्च टीमवर बारीक लक्ष ठेऊन असणार आहेत. बुधवारी दूपारनंतर हे सर्च ऑपरेशन सुरू केले जाईल असा अंदाज आहे.