वाई : आई-वडिल होण्याची भावना कोणाला नको असते? प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला मुलं असावी आपलं छोटसं कुटूंब असावं, परंतु प्रत्येक जोडप्याला हे सुख मिळत नाही. काही शारीरीक अडचणींमुळे जोडप्यांना बऱ्याचदा पालकत्व अनुभवता येत नाही. परंतु यासाठी आता बऱ्याच पद्धीती आल्या आहेत. आपलं सायन्स इतकं पुढे गेलं आहे की, आयव्हीएफच्या माध्यमातून देखील आता जोडप्यांना पालक होणं शक्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु काही लोकांना या गोष्टीची माहिती नसल्याने, तसेच काही लोकं अंधश्रद्धेला बळीपडून चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. ज्याचे नुकसान नंतर त्यांना भोगावे लागतात. वाईमध्ये अशीच एक घटना घडली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल.


मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने मुंबई येथील पती आणि सासूचा विश्वास संपादन करून बावीस वर्षांच्या महिलेवर वाईत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.या प्रकाराने वाई शहरासह तालुक्यात खळबळ उडली आहे.


याप्रकरणी आरोपी आणि एका ओळखीच्या व्यक्तीवरती वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बावीस वर्षीय महिलेनं कुर्ला पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केला. ज्यानंतर हे प्रकरण वाई पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले आहे.


या बावीस वर्षीय महिलेच्या पतीची आणि सासूच्या एका ओळखीच्या व्यक्तीने हे सगळं घडवून आलं आहे, त्या व्यक्तीने त्याच्या सासर्‍याच्या गावी मूल होण्याचे आयुर्वेदिक औषध मिळते, असे सांगून महिलेला वाईमध्ये आणले.


वाई शहरातील आणल्यावर एका अपार्टमेंटमध्ये आणून या महिलेला खोलीत कोंडून ठेवले. तसेच मारहाण करत महिलेवर बलात्कार केला.


यानंतर या जवळील व्यक्तीने चुलत्याच्या गावी यवतमाळ येथे या महिलेला नेले. तेथेही मारहाण करुन तिच्यावर बलात्‍कार केला. तसेच यासंदर्भात कोणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी या पीडितेला दिली गेली होती.


परंतु तरी देखील या महिलेने आरोपी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता या आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे आणि आता वाई पोलिस तपास करत आहेत.