IIT Placement With High Salary Package: चांगलं शिक्षण घेऊन समाधानकारकच नव्हे, तर गडगंज पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न अनेकजण पाहतात. बऱ्याचजणांचं हे स्वप्न साकार होतं. तर, काहींना मात्र या स्वप्नपूर्तीसाठी प्रचंड मेहनत करावी लागते. असंच स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम आयआयटी मद्रासच्या एका विद्यार्थ्यानं केलं असून, या विद्यार्थ्याला शिक्षण पूर्ण होण्याआधी म्हणजेच हातात पदवीचं प्रमाणपत्र येण्यापूर्वीच कोट्यवधींच्या नोकरीची ऑफर देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयआयटी मद्रासमधून विद्यार्थ्याला एकदोन नव्हे, तर तब्बल 4.3 कोटींच्या वार्षिक पगाराचं पॅकेज ऑफर करण्यात आलं आहे. वॉल स्ट्रीट ट्रेडिंदग फर्म Jane Street नं या विद्यार्थ्याला ही ऑफर दिली असून, IIT Placement Season 2025 साठी हे पॅकेज एक मैलाचा दगड ठरत आहे. मूळ वेतन, बोनस आणि रिलोकेशन बेनिफिट्स असे कैक फायदे या विद्यार्थ्याला होणार असल्याचं आयआयटीकडून सांगण्यात येत आहे. 


उपलब्ध माहितीनुसार हाय फ्रीक्वेन्सी ट्रेडिंग फर्मनं ही प्री प्लेसमेंट ऑफर IIT Madras मधील Computer And Science Engineering चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यानं सदर कंपनीमध्ये इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर आता त्याची इथंच नोकरीसाठीसुद्धा निवड करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 


ET च्या वृत्तानुसार नोकरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थी आणि भावी उमेदवारांना हाँगकाँगमध्ये क्वान्टीटेटिव्ह ट्रेडर म्हणून काम पाहण्याची जबाबदारी देण्यात येईल. 


हेसुद्धा वाचा : 3 डिसेंबर... याच दिवशी पाठवण्यात आलेला पहिला SMS; त्यात काय लिहिलेलं माहितीये? 


आयआयटीच्या कॅम्पस इंटरव्ह्यूदरम्यान कोट्यवधींचं पॅकेज ऑफर केलं जाण्याची ही पहिलीच वेळ नसून यामध्ये कोट्यवधींचं पॅकेज देणाऱ्या क्वाडआय कंपनीचाही समावेश आहे. त्याशिवाय क्वांटबॉक्स आणि ग्रेविटन कंपनीनं 90 लाखांचं पॅकेज दिलं असून, डीई शॉ (66-70 लाख रुपये), पेस स्टॉक ब्रोकिंग (75 लाख रुपये), स्क्वॉयरपॉइंट कॅपिटल (66 लाख रुपयांहून जास्त), मायक्रोसॉफ्ट (50 लाख रुपयांहून जास्त) या कंपन्यांचाही समावेश आहे. 


मुंबई, दिल्ली, मद्रास, कानपूर, खरगपूर, रुरकी, गुवाहाटी आणि बीएचयू यांसारख्या आयआयटी कॅम्पसमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना क्वालकॉम, माइक्रोसॉफ्ट, गोल्डमॅन सॅक्स, बजाज ऑटो, ओला इलेक्ट्रिक, अल्फोंसो यांसारख्या कंपन्यांनी नोकरी ऑफर केली. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी देण्यात आलेली वेतनश्रेणी ही तुलनात्मकरित्या सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे.