लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार आज संपणार आहे. रविवारी हाथरस, फिरोजाबाद, एटा, इटावा, मैनपुरी, कासगंज, फारुखाबाद, कन्नौज, औरैया, कानपूर देहत, कानपूर नगर, जालौन, झाशी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा या मतदारसंघात मतदान होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या या मतदानाच्या पार्श्वभूमीवर एक ना अनेक अनोखे किस्से समोर येत आहेत. असाच एक किस्सा आहे समाजवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार रविदास मेहरोत्रा यांचा. ते 66 वर्षांचे आहेत आणि त्यांना समाजवादी पक्षाने लखनौ सेंट्रल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.


रविदास मेहरोत्रा हे उत्तर प्रदेशच्या 'सर्वात जुने' विद्यार्थी नेत्यांपैकी एक आहेत. लखनौ विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी पण त्यांची कारकीर्द नेहमीच गोंधळाची राहिली आहे. आपल्या विद्यार्थी दशेच्या काळात त्यांनी अनेक आंदोलने केली, निदर्शने केली. ते राजकारणात आले आणि त्यांनी तत्कालीन सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली, निषेध केला.


त्यामुळेच मेहरोत्रा यांना एक लढवय्या नेता म्हणून उत्तर प्रदेशात ओळखलं जातं. इतकी आंदोलने केली, निदर्शने केली, टीका केली, निषेध केला तरीही त्यांच्यावर आजमितीस एकही गुन्हा नोंद नाही, वा 'गुन्हेगारी' खटला नाही. पण, तब्बल 251 वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आहे.


सपाचे सरकार दलित आणि दलितांसाठी असेल : मेहरोत्रा


'सपा सरकार हे दलित आणि न्यायापासून वंचित असलेल्या जनतेसाठीचे सरकार असेल. मग ते मुस्लिम, दलित, ख्रिश्चन किंवा ब्राह्मण असे कोणीही असोत. आमचं सरकार कोणत्याही जात, समुदाय किंवा धर्माचा संबंध न ठेवता सर्वांचा 'विकास' करणार आहे. रोटी, स्वस्त कपडा, औषध आणि शिक्षण मोफत हवे या आमच्या वचनावर आम्ही ठाम आहोत.