पाटणा : बिहारमध्ये पुरानं आतापर्यंत १२४ जणांचा बळी घेतलाय... तर मंगळवारी रात्री वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत तब्बल २६ जणांनी आपले प्राण गमावलेत. ७७ लाख नागरिकांना पुराचा फटका बसलाय. १२ जिल्ह्यांमध्ये पूर आला. शिवहर, सीतमढी, मुजफ्फरपूर, पूर्व चंपारण, मधुबनी, दरभंगा, सहरसा, सुपौल, किशनगंज, अरिरिया पूर्णिया आणि कटिहार जिल्ह्यात पुरानं थैमान घातल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिलीय. सुमारे ८१ शिबिरांमध्ये ७६ हजार ४०० पूरग्रस्तांनी आसरा घेतलाय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची २६ पथक, आणि १२५ मोटरबोटच्या साहाय्यानं मदत आणि बचावकार्य सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हसू परतलं... पण दुसरीकडे पुराच्या पाण्यानं आणि विजेमुळे घडलेल्या दुर्घटनांनी डोळ्यांत पाणीही आणलं. 


यामध्ये जुमाई भागात वादळात ८ जणांनी तर औरंगाबादमध्ये विजेच्या धक्क्यानं ७ जणांचा जीव गेला. बाका जिल्ह्यातही तीन वेगवेगळ्या घटनांत ३ जणांचा मृत्यू झाला.