नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. टिकरी बॉर्डरवर मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित आहेत. परंतु या आंदोलनातील एका धक्कादायक बातमीने खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प. बंगालमधून आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या तरुणीवर सामुहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरुणीचा मृत्यू कोव्हिड संसर्गामुळे झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.


काय आहे प्रकरण?


शेतकरी आंदोलनातील सोशल आर्मीच्या आंदोलनकर्त्यांनी तरुणीवर सामुहिक बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सोशल आर्मीतील अनूप आणि अनिल मलिकसह 4 जणांवर FIR दाखल केली आहे. 


तरुणीवर बलात्कार करणारे आरोपी शेतकरी आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते आहेत. आंदोलनस्थळावर उपस्थित जेष्ठ शेतकरी नेते याप्रकरणी हात वर करीत आहेत.  घटनेच्या चौकशीसाठी DSPच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.


महिला आयोगानेही घेतली दखल


याप्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष यांनी म्हटले आहे की, आम्हाला या घटनेचे आश्चर्य वाटतेय की, शेतकरी नेते योगेंद्र यादव यांना बलात्काराच्या घटनेबद्दल माहिती होती. तरी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली नाही. याप्रकरणी आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच योगेंद्र यादव यांना देखील महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे.