कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत इतक्या डॉक्टरांनी गमावला जीव, यामुळे होतोय डॉक्टरांचा मृत्यू
कोरोनामुळे अनेक डॉक्टरांनी गमावला जीव
नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) मंगळवारी म्हटले की, कोरोनाच्या दुसर्या लाटेत कोविड -19 च्या संसर्गामुळे देशभरातील 269 डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. आयएमएने म्हटले आहे की, बिहारमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश (37) आणि दिल्ली (28) या राज्यांचा समावेश आहे.
आयएमएच्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे आंध्र प्रदेशात 19 आणि तेलंगणातील 14, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 14 आणि तामिळनाडूमध्ये 11 मृत्यूची नोंद झाली आहे. ओडिशामध्ये 10, कर्नाटकमधील आठ आणि मध्य प्रदेशात पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये 748 डॉक्टरांनी आपला जीव गमावला. आयएमएने म्हटले आहे की, कोरोनाशी झालेल्या या लढाईत आतापर्यंत 1000 हून अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आयएमएकडे फक्त साडेतीन लाख डॉक्टरांची नोंद असल्याने हा आकडा जास्त असू शकतो, असे आयएमएचे म्हणणे आहे. तर देशात 12 लाखाहून अधिक डॉक्टर आहेत.
आयएमएच्या म्हणण्यानुसार देशातील एकूण आरोग्य कर्मचार्यांपैकी 66 टक्के कर्मचार्यांना आतापर्यंत लसी देण्यात आली आहे. त्याच वेळी पंतप्रधान मोदींनी सोमवारी सांगितले होते की, सुमारे 90 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
आयएमएचे डॉ अनिल गोयल यांनी सांगितले की, कोविड युनिटमध्ये रात्रंदिवस कार्यरत असलेले डॉक्टर. लसीकरणानंतरही, त्यांची प्रतिकारशक्ती इतकी असू शकत नाही की ते कोविडच्या नवीन प्रकारावर मात करू शकतात, म्हणून डॉक्टरांचा मृत्यू होत आहे. 'मला डॉक्टर आणि प्रशासनाला सांगायचे आहे की, त्यांनी 6-8 तासांपेक्षा जास्त काम करू नये.'