Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा गुरुवारी म्हणजेच 2 मे रोजी सोन्याच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळतेय. वायदे बाजारात सोन्याच्या दरात 400 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळं सोन्याचा भाव 71,000 वर पोहोचला आहे. तर, चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाली आहे. चांदी 50 रुपयांनी वाढून 80,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली आहे. 


सोन्याला झळाळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वायदे बाजारात सोने गुरुवारी हिरव्या रंगात झळकले. आज सोन्याच्या दरात 368 रुपये प्रति 10 ग्रॅमची झळाळी दिसून आली. यामुळं सोनं 71,093 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचलं आहे. तर या आधी सोनं 70,725  रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होते. 


चांदी चमकली


MCX वर सोन्याबरोबरच चांदीच्या भावातही झळाळी दिसून आली आहे. चांदी आज वायदे बाजारात 130 रुपयांनी महाग झाली असून 80, 000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. मंगळवारी चांदी एमसीएक्सवर 79,870 रुपये किलोग्रॅम इतकी होती. 


मेट्रो शहरात सोन्याचे दर कसे आहेत?


- मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 72,270 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. तर, चांदी 83,500 इतके आहेत. 


पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे भाव 72,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 83,500 रुपये प्रति किलोग्रॅम इतके आहेत.


- दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 83,500 रुपये किलोग्रॅम इतके आहेत. 



सोन्याचे दर कसे असतील?


22 कॅरेटच्या एक ग्रॅम सोन्यसाठी ग्राहकांना 6,625 रुपये मोजावे लागणार आहेत. तर, 24 कॅरेटसाठी 7,227 रुपये 1 ग्रॅमसाठी मोजावे लागणार आहेत. 


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट    66, 250 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट   72, 270 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट   54, 210 रुपये


आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण


एकीकडे सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतंय. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र आहे. कॉमेक्सवर गोल्ड जून फ्युचर्स 8.79 डॉलर स्वस्त होऊन 2,315.70 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तर, चांदी कॉमेक्सवर मे फ्चुचर्स कॉन्ट्रेक्ट 0.25 डॉलर स्वस्त होऊन 26.53 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.