नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी जनतेला दिलासा देणारी माहिती दिली आहे. नवं वर्ष सुरू झाल्यानंतर ३ ते ४ महिन्यात देशातील नागरिकांना कोरोनावर लस उपलब्ध होणार आहे. तसेच जुलै - ऑगस्ट महिन्यापर्यंत जवळपास २५ ते ३० करोड लोकांना कोरोना लस देण्याची योजना आहे. याबाबत आता तयारी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हॅक्सीन विकसीत आणि त्याच्या निर्माणाकरता तीन टीमशी ऑनलाईन संवाद साधला आहे. लस प्रभावित होण्यासोबतच कोरोनावरील माहिती अधिक सोप्या शब्दात कशी सांगता येईल याकडे लक्ष द्या. 



यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना कोरोनाचे नियम पाळावे, अशी विनंती केली. यासह ते असेही म्हणाले की, पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील लोकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. "माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत. त्यानुसार वर्तन करावे. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे.


आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे.", असे आवाहनही आंदोलक शेतकऱ्यांना हर्षवर्धन यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात अद्याप सुरू आहे. गेल्या २४ तासात देशात गेल्या २४ तासात ३८,७७२ हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत बाधितांचा आकडा ९४ लाख ३१ हजार ६९२ इतका झाला आहे. तर गेल्या २४ तासात ४४३ जणांचे प्राण कोरोनामुळे गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात ४५ हजार ३३३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.