नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलानं दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कारवाईला मोठं यश मिळालंय. पुलवामाच्या त्राल भागात सुरक्षादलाच्या चकमकीत जैश-ए-मौहम्मदचे तीन दहशतवादी ठार झालेत. सुरक्षा दलानं या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतलेत. सोबतच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि स्फोटकं जप्त करण्यात आले आहेत. या भागात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी मुदासीर याचादेखील समावेश आहे. मुदासीर याने पुलवामामध्ये सीआरपीएफ दलावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी स्फोटकं पोहचवली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा दलानं दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात पिंगलिशमध्ये जमावबंदी केलीय आणि सोबतच सर्च ऑपरेशनही सुरू आहे. या भागात दहशतवाद्यांनी आसरा घेतल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यांचा शोध घेताना सुरक्षा दलावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यावर प्रत्यूत्तर म्हणून सुरक्षा दलानं ही कारवाई केली. 


पोलिसांनी स्थानिकांना एन्काऊंटर स्थळापासून दूर राहण्यास सांगितलंय. या जागेवर स्फोटकं असल्यानं धोका असल्याचंही सांगण्यात आलंय.