नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेची ताकद आणखी वाढणार आहे, कारण फ्रान्समधील आणखी तीन राफेल लढाऊ विमान भारताकडे नॉन-स्टॉप फ्लाइट्सवर गेले आहेत. फ्रान्समधून भारतात येत असताना या विमानांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये हवाई इंधन देण्यात येणार आहे. या संदर्भात फ्रान्समधील भारतीय दूतावासांनी माहिती दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी सकाळी 11 वाजता गुजरातमधील जामनगरमध्ये तीन नवीन राफेल लढाऊ विमान उतरतील. राफेल विमानांचं तिसऱ्यांदा भारतात पुरवठा होत आहे. भारतीय वायुसेनेने सप्टेंबर २०१६ मध्ये फ्रान्सकडून ५९ हजार कोटींमध्ये 36 राफेल विमाने खरेदी केले. तीन नवीन विमानांच्या आगमनानंतर भारताकडे 11 राफेल विमाने असतील.



२९ जुलैला पाच राफेल विमानांचा पहिला सेट अंबाला एअर बेसवर पोहोचला. नंतर या पाच विमानांना औपचारिकपणे भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संरक्षण मंत्र्यांच्यासमवेत फ्रान्सचे संरक्षणमंत्री फ्लोरेन्स, सीडीएस बिपिन रावत आणि हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरिया देखील उपस्थित होते.