मुंबई : बँकेचं खातं सुरू ठेवायचं असेल तर बातमी तुमच्या कामाची... खुश है जमाना आज पहिली तारीख है... आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या सर्व बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडण्यासाठी आता फक्त ३१ दिवस उरलेत. जर तसं झालं नाही.... तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या पगार मिळणार नाही.


...तर बँक खाती गोठवणार


आधार क्रमांक बँक खात्याशी जोडण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ ही अंतिम तारीख आहे. प्रत्येक बँक खात्याशी आधार जोडणे बंधनकारक आहे. तारखा पाळल्या नाही, तर बँक खाती गोठवण्यात येणार आहेत.


३१ डिसेंबरच्या पार्टीचा प्लान?


त्यामुळे यंदाच्या ३१ डिसेंबरला पार्टीला जाताना खात्याचा बॅलन्स आणि खातं आधारशी जोडलं गेलय की नाही? याचीही शाहनिशा करुन मगच बाहेर पडा... अन्यथा १ जानेवारी रोजी मध्यरात्री फजिती होईल...


आधार क्रमांक - बँक जोडणी


आधार - बँक जोडणीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. बहुतांश बँकांनी आपल्या अॅप्समध्ये ही सुविधा उपलब्ध केली आहे. शिवाय तुमच्या बँकेच्या शाखेतही आधार जोडणी शक्य आहे. 


ज्यांच्याकडे आधार नंबर नाही त्यांना तो काढता यावा यासाठी जवळपास सर्व सरकारी बँकानी प्रत्येक तालुक्यात किमान एका शाखेत आधार नोंदणी सुरु केली आहे.