मुंबई : सगळीकडेच सरत्यावर्षाचा उत्साह आहे. 2020 या नव्यावर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. पण यंदा 2019 वर्षाचा शेवटचा दिवस हा मंगळवारी आल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. वर्किंग डेमध्ये थर्टीफस्ट आल्यामुळे अनेकांना आजची रात्र साजरी करताना येणार नाही. पण त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बाब म्हणजे यंदाचा उत्साह ते पुढच्या वर्षांपर्यंत राखून ठेवू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 च्या स्वागतासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. 2020 हे वर्ष लीपवर्ष असल्यामुळे कामाचा एक दिवस जास्त असणार आहे. यामुळे 2020 च्या कॅलेंडरमध्ये देखील बदल झाला आहे. यंदा थर्टीफस्ट मंगळवारी येत असल्यामुळे कुणालाही खासं असं सेलिब्रेशन करता येणार नाही. पण 2020 चं थर्टीफस्ट हे शुक्रवारी येत असल्यामुळे लोकांमध्ये खास आनंद आहे. 31 डिसेंबर 2020 रोजी शुक्रवार असल्यामुळे 2021 चं स्वागत हे दोन दिवस चालू शकतं. 1 जानेवारी 2021रोजी शनिवार असून 2 जानेवारी 2020 रोजी रविवार असणार आहे. यामुळे पर्यंटकांनी आतापासूनच 2020 च्या स्वागताचा विचार केला आहे. (2020 मध्ये कोणतेही व्यवहार करताना 'ही' काळजी घ्याल) 


बुधवारपासून नूतन वर्ष सन २०२० मध्ये चाकरमान्यांसाठी  सुट्यांची चंगळ,लीपवर्ष असल्याने कामासाठी वर्षात  एक दिवस जास्त ,  खगोलप्रेमींसाठी कंकणाकृती सूर्यग्रहण दर्शन, सुपर मून दर्शन, ब्ल्यू मून योग , सुवर्ण खरेदी करणारांसाठी चार गुरुपुष्य योग, आश्विन अधिकमास आणि विवाहेच्छुकांसाठी भरपूर विवाह मुहूर्त आहेत असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण  यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की यावेळी लीप सेकंद पाळला जाणार नसल्याने मंगळवार ३१ डिसेंबर रोजी रात्री ठीक १२ वाजता नूतन वर्ष २०२० सुरू होणार आहे. तसेच सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीत २९ दिवस आल्याने या वर्षात एकूण ३६६ दिवस मिळणार  आहेत. कामांची पूर्तता करण्यासाठी १ दिवस जास्त मिळणार आहे.


चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी 


या नूतन वर्षात एकूण २४ सुट्ट्यांची चंगळ असणार आहे. प्रजासत्ताक दिन ( २६ जाने.), पारसी न्यू इयर ( १६ ऑगस्ट ), मोहरम ( ३० ऑगस्ट ), विजया दशमी (२५ ऑक्टोबर)  या चारच सुट्ट्या रविवारी येणार आहेत. इतर २० सुट्ट्यांपैकी बकरी ईद( १ ऑगस्ट ), स्वातंत्र्य दिन  ( १५ ऑगस्ट ) , श्रीगणेश चतुर्थी ( २२ ऑगस्ट) , दिवाळी लक्ष्मीपूजन ( १४ नोव्हेंबर )  या सुट्ट्या शनिवारी रविवारच्या सुट्टीला जोडून येणार आहेत. तसेच श्रीमहावीर जयंती ( ६ एप्रिल ) , रमजान ईद ( २५ मे ) , दिवाळी बलिप्रतिपदा ( १६ नोव्हेंबर ) , गुरुनानक जयंती ( ३० नोव्हेंबर ) या सुट्ट्या सोमवारी रविवारला जोडून येणार आहेत.


त्यापैकी २१ जूनच्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून दिसणार आहे. उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. १४ डिसेंबर रोजी होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.  १० जानेवारी व ५ जूनचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. ५ जुलै व ३० नोव्हेंबरचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाहीत. ७ एप्रिल रोजी रात्री आपणास सुपरमूनचे दर्शन होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र ३ लक्ष ५६ हजार ९०७ किमी. इतका पृथ्वीच्याजवळ आल्याने १४ टक्के मोठा व जास्त तेजस्वी दिसणार आहे. नूतन वर्षी  १ व ३१ ऑक्टोबर रोजी अशा  दोन पौर्णिमा आल्यामुळे ३१ ऑक्टोबरला ‘ ब्ल्यू मून ‘ योग आला आहे.