नवी दिल्ली : औषधांमध्ये मोठा खर्च होणाऱ्या लोकांसाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनपीपीएने डायबिटीज आणि ब्‍लड प्रेशरसह ३३ औषधांचे मुल्य फिक्स केले आहेत. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने कँसरच्या उपचारासाठी उपयोगात येणारी औषधं जेमसिटाबाइनसह तीन औषधांचे मूल्य देखील ठरवले आहेत.


एनपीपीएने एका अधिसूचनेत म्हटलं की, प्राधिकरणाने औषधांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी २०१३ अंतर्गत ३३ औषधांच्या फार्मुलेशनचे मूल्य ठरवले आहेत.


प्राधिकरणाचं काम नियंत्रित औषधांच्या किंमती ठरवणे आणि संशोधन करणे आहे. देशाच औषधांची उपलब्धता सुनिश्चित करने आहे. हे संस्थान नियंत्रण मुक्त औषधांवर देखील नजर ठेवते. कारण त्याची किंमत नियंत्रित राहावी.